रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 3

  • 270
  • 111

भाग -३जसजसे ईशा आणि अर्णव डायरीतील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते, तसतसे त्या बंगल्यात विचित्र घटना घडायला लागल्या. सुरुवातीला त्यांना वाटलं की तो त्यांचा भास आहे, पण हळू हळू त्या गोष्टी अधिक स्पष्ट आणि भीतीदायक होऊ लागल्या.रात्रीच्या वेळी त्यांना कोणीतरी हळू हळू चालण्याचा आवाज ऐकू यायचा, जणू कोणीतरी त्यांच्या आजूबाजूला फिरत आहे. पण जेव्हा ते बघायला जायचे, तेव्हा त्यांना कोणीच दिसत नसे. कधी कधी त्यांना एखाद्या खोलीतून अचानक थंड वाऱ्याची झुळूक जाणवायची, जरी खिडक्या आणि दरवाजे बंद असले तरी.एका रात्री ईशाला तिच्या खोलीत कोणीतरी फुसफुसल्याचा आवाज ऐकू आला. तिला वाटलं की अर्णव तिला बोलवत आहे, म्हणून ती दाराजवळ गेली, पण