अंधार पडले होते . तरी साहिलचा काहीच पत्ता नव्हता . श्रुती झोपली नव्हती , ती झोपणार तरी कशी तिला आज झोपच येईल तरी कसी तिचे डोळे रडुन रडुन सुजले होते . सोहम आपला विश्वासीघात करेलच कसा ? पण तिने जे काही ऐकले होते व पाहिले होते त्यावर तर ती विश्वास ठेवू शकत होती . अचानक दार उघडल्याचा आवाज आला . सोहम हळूच दारातून आत आला व त्याने आवाज न करता दरवाजाही बंद केला . तो मागे फिरला तर समोरच श्रुतीला उभे पाहून तो एकदम दचकला." तु झोपली नाहीस अजून ? ", सोहमने एक आवंढा गिळतच शब्द बाहेर काढले ." तु असा