जसे बाहेर दयावान दिसता, तसे घरातही व्हा? काही लोकं असे असतात की ते दिखावा करीत असतात. कारण सध्या दिखाव्याचं जग आहे. या जगात काही लोकांना दिखावा केल्याशिवाय जमतच नाही. महिला..... महिलांबाबत काही लोकं अशीच भुमिका ठेवणारे आहेत. ते बाहेरमध्ये महिलांच्या बाबतीत दया दाखवतात. त्यांना पाहून अससं वाटतं की त्यांच्याएवढं दयावान जगात कुणीच नाही. एवढा दयावानपणा ते दाखवीत असतात. तो दयावानपणा त्यांच्या कृतीतही असतोच. परंतु प्रत्यक्षात घरात त्यांचा दयावानपणा पाहायला दिसत नाही. घरात मात्र त्यांचा स्रीजातीवर अर्थात घरच्या पत्नीवर, मुलींवर, बहिणीवर वा त्याच्या स्वतःच्या आईवर अत्याचार सुरु असतो. पत्नी, मुलगी,