पापक्षालन भाग 5स्वतः तेजदत्त निवडक स्वारांसह राजप्रासादावर चाल करुन गेले. दत्तांनी राजप्रासादाला वेढा घातला. आदल्या रात्रीच्या नशेत गुंग झालेले रक्षक समशेरी परजीत प्रासादाबाहेर धावले. प्रासादातील रक्षकांची संख्या विपुल होती. परंतु बेसावध असताना झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचले होते. लोहपट्टीकेच्या अद्भुत शस्त्राची चांगली किमया झाली अन् रक्षकांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. राजरक्षकांचा प्रतिकार क्षीण झालेला दिसताच तो मोका साधून तेजदत्तानी राजप्रासादात प्रवेश केला. यवन सरदारासह प्रासादातील सर्व रक्षक जेरबंद झाले. सरदाराचे दोन्ही हात छाटून त्याला एका अश्वावर बसवून संपूर्ण राजधानीत फिरवून विभवेवर पूर्व सत्ताधिश मेघवत्सांचे पुत्र तेजदत्त यांचे साम्राज्य प्रस्थापित झाल्याची दवंडी