पापक्षालन भाग 3 पित्याचे कथन ऐकून प्रभावित झालेल्या तेजदत्तानी थरथरत्या आवाजात प्रतिज्ञा केली, विभवेच्या राजघराण्यातील हा शेवटचा वंशज महाप्रतापी सूर्यदेव आणि साक्षातपरब्रह्मस्वरुप आचार्यांच्या साक्षीने प्रतिज्ञाबध्द आहे. विभवेवर चंद्रवंशीयांचा राजध्वज फडकविणे हे आमच्या जीवनाचे परम प्राप्तव्य राहील. वाटेल ते अग्निदिव्य करुन आम्ही ते साध्य करु अथवा आत्माहुती देऊ. आम्हाला शत्रूच्या कचाट्यातून सोडविणाऱ्या डोंगा भिल्लाच्या स्मरणार्थ विभवेच्या मुख्य चौकात स्तंभ उभारु हाआमचा पण आहे. ‘‘ द्रविड प्रांतात आल्यापासून दीड तपांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रथमच महाराजांच्या मुखावर समाधानाची छटा दिसली. आपला शौर्यबिंदू घेऊन वाढलेले, आचार्यांच्या संपन्न संस्कारांनी समर्थ झालेले तेजदत्त ! विभवे वरील अमंगल सावट दूर करण्यासाठी ते प्रतिज्ञाबध्द झाले. आपल्या जन्माचे सार्थक