पापक्षालन भाग 2इतिहासात झालेल्या घनघोर लढाया आणि यावनी सेनेचे हल्ले यामध्ये फार फार अंतर होते. साधन शुचितेचे ताळतंत्र नसलेले मदांध-दुष्ट यावनी हल्लेखोर! पादाक्रांत केलेल्या भागातील प्रजेवर अनन्वित अत्याचार त्यांनी केले. वृद्ध, बालके, स्त्रिया यांची निर्घृण कत्तल केली. स्त्रियांवर अत्याचार केले. मार्गातील मंदिरे, पाठशाला, विजयस्तंभ, शिलालेख, धर्मस्थळे, गुरुकुले,स्वागत कमानी उद्ध्वस्त करीत, सक्तीने धर्मांतरे करीत महान संस्कृतीची राखरांगोळी करीत हल्लेखोर मुसंडी मारीत विभवेच्या सीमेवर आले. सीमावर्ती भागातील प्रजाजनांवर होणाऱ्या अत्याचारांची वर्णने ऐकून मेघवत्साना अन्न गोड लागेना. या परचक्रात विभवेचे साम्राज्य अस्तंगत होणार असे भाकित राज ज्योतिषानीही वर्तविले. हल्लेखोरांच्या एक एक कारवाया एोकून महाराजांच्या काळजाचे पाणी झाले. धर्मभंजक, संस्कृती