पापक्षालन - भाग 1

  • 525
  • 1
  • 162

                         पापक्षालन  भाग 1           “अन् लोहशृंखलेचा खळळ् खळळ् असा ध्वनी ऐकू आला.  काही क्षणांतच जहाज स्थिर होऊन लाटांवर हेलकावे खाऊ लागले.  जहाजाचा कप्तान,खलाशी वर्ग, रक्षक कमरबंदातल्या थैल्या सांभाळीत जहाजाबाहेर निघाले.  द्रविड प्रांतातले ते थिरुकोट्टा नबंदर मदिरा आणि वारांगनासाठी खास प्रसिद्ध. तिथून जा - ये करणारी जहाजे हटकून थिरुकोट्टाला नांगरली जाायची. जहाजावरच्या गुलामांना जखडबंद केलेले होते. खेरीज दोन तीन हरकामे नोकर होते. म्हणून केवळ दोन हशमांना जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी मागे थांबायची सूचना देऊन बाकीचे मौजामजाा करायला निघून गेले. आपल्याला पहाण्यासाठी थांबवले याचा राग त्या हशमांनी जेरबंद गुलामांवर आसूडाचे प्रहार करुन व्यक्त केला.तेजदत्त! तो क्षण माझे अन् तुमचेही भवितव्य ठरविणारा निर्णायक होता. थोडा