हवीहवीशी ती!

  • 219
  • 69

ती,एका गरीब कुटुंबातील एक ती. जन्म होताच आई ला गमावले आणि काहीच दिवसात वडील देखील वारले.चार बहिणी एकमेकांना समजून उमजून राहू लागल्या. ती सर्वात लहान आणि तीन बहिणींची लाडकी. घरात जे काही आणले जात ते आधी तिला भेटत असे. तीन ही बहिणी अशिक्षित अडाणी पण तिला शिकवले अगदी चिकाटी ने आणि ती देखील अगदी जिद्दीने शिकली .शाळेत म्हणा किंवा कॉलेजात अगदी लांब लांब पर्यंत चालून प्रवास करत. कधी नवीन पुस्तके नाही की नवीन शाळेचा गणवेश नाही जे काही असेल ते जुनेच, परंतु कधी तक्रार केली नाही. बऱ्याच वेळा खायला देखील शिळे अन्न असे. तरीही अगदी हुशार आणि चलाख. कमी आहे म्हणण्यापेक्षा