भुईकमळ

  • 474
  • 147

एकदा माझ्या एका मित्रा च्या बागेत या फुलाचा ताटवा दिसला माझा हा मित्र वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचा खूप शौकीन होता आमच्या गावी बदलीवर आलेला तो एका भाड्याच्या घरात राहत होता तरीही त्याने आजूबाजूला मस्त फुलबाग फुलवली होती जेंव्हा या फुलांचा ताटवा त्याच्याकडे पाहिला तेव्हा ती सुंदर पांढरीशुभ्र आणि गुच्छा प्रमाणे आलेली फुले बघून  आणी त्याचा मंद मोहक वास पाहून  मी त्याला या फुलांचे नाव विचारले तर तो“भुईकमळ असे म्हणाला ..त्या वेळीच त्या फुलांनी माझे चित्त आणि मन मोहून घेतले होते..दोन तीन वर्षे आमची मैत्री होती ..एकमेकांकडे सतत येण्याने असायचे माझी घरची बाग सुद्धा खूप मोठी होती त्यालाही माझी बाग आवडायची पण नंतर नोकरी एका वर्षी त्याची बदली होऊन त्याला