दर्शन - एखादा माणूस जेव्हा देवळात किंवा तीर्थक्षेत्राला जाणार असतो तेव्हा देवदर्शनाला चाललोय असे म्हणतो. त्याच्या दृष्टीने दर्शन महत्वाचे आहे. मानसपुजा ही मनाने दर्शन घेण्याची पद्धत आहे. दर्शन म्हणजे बघणे, पाहणे. सकाळी पुजा झाल्यानंतर फुलांनी, अलंकारानी सजलेल्या मुर्तींचे दर्श़न हा एक सुखद अनुभव असतो. मुर्तीकडे बघताना ती मुर्ती आपल्याकडे बघत आहे असे वाटते आणि हेच आहे दर्शनाला जाणेचे मुळ कारण. आपण देवाला भेटत आहोत तो आपल्याकडे पाहत आहे असे वाटते. आणि आपण त्याला प्रार्थना करतो तेव्हा हे दर्शन तत्व प्रेरणादायी असते. समोर साक्षात देव उभा आहे असे वाटते. आपल्या देवांच्या मुर्तीमध्ये डोळे घडवणेला फार महत्व आहे अगदी अलीकडेच अयोध्येतील राम मुर्ती घडवताना पण हा अलौकीक