निकीताचे हात पाय घट्ट बांधले होते . त्यामुळे तिला कोणतीच हालचाल करता येत नव्हती ती एकटक छताकडे पाहत होती . बघता बघता ती भुतकाळ हरवली कारण , ती आता निकीता नव्हती तर , कोणातरी वेगळ्या स्त्रीने तिच्यावर कब्जा केला होता . कोण होती ती ? काय होता तिचा भुतकाळ ?काही वर्षांपूर्वी......" श्रुती अगं ए... , श्रुती लवकर उठ बघ तुझी मैत्रीण तुझी वाट पाहत आहे ", श्रुतीच्या आईने तिला पाचव्यांदा आवाज दिला . श्रुतीने घड्याळही खाली आपटले होते . ती आळस देतच उठली . "अगं ! तुला कॉलेजला जायचे नाही काय ? बघ तुझी मैत्रीण केव्हाची तुझी वाट पाहत आहे.", श्रुतीची