स्रियांची कामं ; आम्ही खरंच दयावान आहोत का? स्री...... स्रियांचा आजचा काळ पाहिल्यास आपल्याला दिसतं की आजची स्री घरी बरीच कामं करते. ती सकाळी उठते व उठल्याबरोबर सडा सारवण करते. त्यानंतर मुलांची सकाळी शाळा असेल तर त्यांच्या शाळेची तयारी करुन देते. त्यामध्ये मुलांची अंघोळ, त्यांची केशसज्जा, त्यांना कपडे घालून देणे, त्यांना नाश्ता करवणे व सोबत आपलं मुल शाळेत उपाशी राहू नये यासाठी त्याला जेवनाचा डबा देणे. इत्यादी कामं करते. मुल शाळेत गेलं की ती दात घासते. त्यानंतर अंघोळ करुन पुन्हा ती स्वयंपाक करते. ती जेव्हा स्वयंपाकाला बसते. तेव्हा तिचा पती उठलेला असतो व त्याचं दातवन झालेलं असतं.