"आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो, धन्यवाद!" - असं म्हणून आपले निरोपाचे भाषण संपवून श्रीपाद जमादार आपल्या जागेवर बसले. गेले ४० वर्ष आपलं काम इमानदारीन करून अनेकवेळा आपल्या कामाबद्दल आणि इतर गुणांबद्दल बक्षीस, प्रशंसा मिळवणारे. ४० वर्षांपूर्वी ह्या कचेरीत आले पहिल्यांदा तो दिवस अजूनही त्यांना आठवत होता. सगळ्यांच्या ह्यांच्यावर नजरा रोखलेल्या. आणि हे सुद्धा एका बाजूला गुपचूप बसून सगळं न्याहाळत होते. साहेबानी बोलवलं तस आत जाऊन आपलं काम समजून घेतल आणि नेमून दिलेल्या जागी बसले.. कचेरीत लागल्यापासून त्यांनी ऑफिस मध्ये बराच नाव लौकिक कमावला आणि तो सुद्धा काही वर्षातच.. पुढच्या दोन वर्षातच आपल्या चोख कामामुळे बढती मिळून श्रीपादचे