"अरे थांब, सावकाश... पडशील.." मिथिला अभय च्या पाठी धावत होती. बेडरूम मधून हॉल, तिथून किचन... अभय नुसता पळत होता. नवसाने झालेला हा मिथिला आणि अमर चा एकुलता एक मुलगा. त्यात सातव्या महिन्यातच जन्माला आला म्हणून त्या काचेच्या पेटीत ठेवला होता म्हणतात. मग काय संपूर्ण जोशी कुटुंबच शेंडेफळ म्हणून संकष्टीला जन्माला आला... तेव्हा म्हणे ह्याच्या आज्जीने अक्खा दिवस त्या गणपतीला पाण्यात ठेवून सतत अभिषेक केला होता.. अर्थात त्याने फळ दिलंच म्हणा.. अभय म्हणजे शकुंतला आज्जीचा जीव. त्यात आई बाबा दोघेही कामानिमित्त दिवसभर घराबाहेर.. सगळे तिला शकू आज्जी म्हणायचे.. होतीच तशी ती प्रेमळ... लहानपणापासूनच्या संस्कारामुळे सतत देत राहायचं हा तिचा स्वभाव..मोठी झाल्यावर