मातृ दिना निमित्त तुमच्या आईच्या आवडीचा कोणता पदार्थ होता..असे विचारल्या वर डोळ्यात पाणी दाटून आलेखरेतर मुलांच्या आवडीतच तिची आवड असायची ️तशी तिची आठवण नाहीं असा दिवसच नसतो म्हणा.. मला आई आठवते ती कायम कामात असलेलीशाळेची नोकरीघरचे शिवणकामस्वतः चे ब्लाऊज माझे सर्व कपडे शिवणारी चटणी ,कोशिंबीर, भाजी, आमटी, पोळी भात यासह पुर्ण स्वयंपाक रोज न कंटाळता करणारी(कारण वडिलांना रोज साग्र संगीत जेवण हवे असे )सुटी दिवशी वेगवेगळे पदार्थ सतत करणारी अशी अन्नपुर्णा म्हणून आठवते ती माझी आईजीने घरच्या सर्वांना त्यांच्या आवडीचे अनेक चविष्ट पदार्थ करून घातलेले होते तिच्या हाताखाली मी मुळ स्वयंपाकाचे धडे घेतले असे नाही कदाचित म्हणता येणार ...कारण तिने माहेरी असताना कोणतेच स्वयंपाकाचे