*स्रियांबाबत भुमिका ; संभ्रमाची?* *आज स्रिया जागतिक स्तरावर उत्तुंग भरारी घेतांना दिसत आहेत. त्या अवकाशात जात आहेत. शिवाय त्यांचा आजच्या परिस्थितीबाबत विचार केल्यास आज स्रियांनी जमीन, पाणी व अवकाश, ही तिन्ही क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी काही स्रियांची आजची परिस्थिती पाहता स्रियांबाबत आज नेहमीच संभ्रम वाटतो व वादाची स्थिती निर्माण होते आणि आज संविधान बनलं असलं तरी त्या स्थितीवरुन वाटतं की खरंच स्री खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाली काय? वाटतं की का स्रियांना जे दुय्यम स्थान होतं. ते स्थान आजही अबाधित आहे.