शब्दांच्या मागे लपलेले हृदय: न वाचलेल्या प्रेमकवितांची कहाणी

  • 213
  • 54

प्रेम हे मानवी जीवनातील सर्वात गूढ, गहन आणि व्यापक भाव आहे. अनादी काळापासून ते प्रत्येक युगाच्या लेखणीत उतरले आहे – कधी राधा-कृष्णाच्या रासात, कधी मीराबाईच्या भक्तीगीतांत, कधी गालिबच्या शेरोशायरीत, तर कधी सामान्य माणसाच्या मनाच्या कोपऱ्यात. प्रेमावर लाखो कविता लिहिल्या गेल्या, गाण्यात गुंफल्या गेल्या, कादंबऱ्यांमध्ये सजवलेल्या गेल्या. पण तरीही, अजूनही प्रेमाच्या काही कविता अशा आहेत ज्या कोणाच्याच ओठांवर आल्या नाहीत, कागदावर उतरल्या नाहीत, केवळ मनातच हरवून गेल्या.या लेखाचा हेतू अशाच ‘न वाचलेल्या प्रेम कविता’ शोधण्याचा आहे – त्या भावना, त्या नजरा, त्या शब्द ज्यांनी कधीच बाहेर पडायचे धाडस केले नाही. कित्येक वेळा आपल्याला एखाद्याबद्दल खूप काही वाटतं, पण आपण ते बोलू