दगडांमधली सावली

  • 897
  • 267

गावात शिरताच डावीकडे एक चिंचोळा रस्ता फुटतो – दोन माणसं समोरासमोर आली तर एकाला थांबावं लागेल, असा. या रस्त्यावर उन्हाळ्यात धूळ साचते, पावसाळ्यात चिखल, आणि हिवाळ्यात धुकं. त्या धुक्यात, जणू काही काळ विसावला असतो.हाच रस्ता जातो जुन्या स्मशानभूमीकडे.गावातल्या लोकांचं तिथे फारसं पाऊल पडत नाही. मृतांच्या आठवणींना ताजं ठेवण्याचा प्रघात कुणी ठेवलेला नाही. पण त्या स्मशानाच्या मागच्या कुशीत एक दगडांची बारी आहे – पडलेली, झाडांनी आच्छादलेली. त्या दगडांमध्ये, एक सावली दररोज दिसायची – एक वृद्ध बाई, जिनं वेळेच्या बाहेर आपलं घर वसवलं होतं.ती होती रामाई.गावात ती “वेडी बाई” म्हणून ओळखली जायची. तिचा वेष साधा – पांढराशुभ्र साडी, गळ्याला जीर्ण ओढणी, आणि