. तीला मी शेजीबाई म्हणते .खरे म्हणजे ती माझ्या शेजारी रहात नाही ती आमची घर मालकीण आहे .आमच्या खालच्या मजल्या वर राहणारी ...पण शेजीबाई ..असे म्हणले की जो एक “आपुलकीचा” आणी मैत्रीचा “फील” येतो ना तो तिच्या बाबतीत मला पहील्यापासुन जाणवत होता .त्या छोट्या गावात मला भेटलेली ती पहिली स्त्री होती .. अगदी पहिल्या भेटी पासून च तीने मला जीव लावायला सुरु केले होते जणु काही ती प्रथम दर्शनी माझ्या” प्रेमात” पडली होती भाड्याचे घर पाहायला म्हणून आम्ही तिच्या कडे गेलो ..तिने सुंदर अशा कॉफी ने आमचे स्वागत केलेसहज म्हणून पाहिलेले हे पहिलेच घर आम्हाला लगेच पसंत पडले दुसऱ्या दिवशी पासून आम्ही तीथे राहायला गेलो लगेच दुसऱ्या दिवशी