प्रकरण १७कोर्टाने जेवणाची सुट्टी जाहीर केली त्यावेळेला कनक ओजस , सौम्या सोहोनी आणि पाणिनी कोर्टाजवळच्या एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेले. त्यांचे जेवण चालू असतानाच त्यांच्या ऑफिस मधील रिसेप्शनिस्ट गती तिथे पळत पळत आली आणि त्यांच्या टेबलावर येऊन तिने एक मोठा गौप्य स्फोट केला. तिने सांगितलं की कोर्टाची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर मी कोर्टातून आपल्या ऑफिसमध्ये गेले होते तर तिथे मृण्मयी भगली म्हणजे कामतची पूर्वीची सेक्रेटरी, जी आता पुन्हा कामत कडे कामाला लागली होती, ती आपलं काम करत असताना तिला एका जुन्या फायलीची आवश्यकता लागली म्हणून रॅक मधील एक वरच्या बाजूची फाईल काढत असताना तिला रक्ताचे डाग पडलेला एक टॉवेल तिथे