प्रकरण १६“ साक्ष देऊन बाहेर पडताना तू मला उद्देशून काही बोललास.काय ते या कोर्टाला सांगशील का?” पाणिनीने विचारलंकामतचा राग अजून उतरला नव्हता. “ मी म्हणालो की मी तुला ठार मारीन पटवर्धन.” कामतम्हणाला, “ आणि देवा शप्पथ मी मारीन तुला.”“ तुम्ही भर कोर्टात काय बोलताय समजतंय का तुम्हाला? अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धनना मारायची धमकी देताय तुम्ही. याचा परिणाम काय होईल माहित्ये?” न्यायाधीश बहुव्रीही यांनी आश्चर्य आणि रागाने विचारलं.“ न्यायमूर्ती महाराज, साक्षीदाराला ज्या पद्धतीने पाणिनी पटवर्धन यांनी प्रश्न विचारले, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढळली....” खांडेकर मदतीला येत म्हणाले.“ यांना २४ तासांसाठी कस्टडीत टाका.” खांडेकरांकडे पूर्ण दुर्लक्ष करत न्यायाधीशांनी बेलीफ ला आदेश दिला.बेलीफने कुमार