रिव्हॉल्व्हर - प्रकरण 15

  • 669
  • 1
  • 264

प्रकरण १५दुसऱ्या दिवसासाठी खांडेकरांनी आपला खास राखून ठेवलेला साक्षीदार तपासणीसाठी बोलावला“ कार्तिक कामत च्या कुमारला, कुमार कामतला बोलवा.” ते म्हणाले.कुमार कामत हजर झाला.त्याचा चेहेरा गंभीर, कणखर आणि निश्चयी होता. त्याने शपथ घेतली आणि आपला परिचय दिला.“ मी तुला आधीच एक महत्वाची सूचना देतोय की तुला विचारले जाणारे प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक ऐक आणि नंतरच उत्तर दे.कोणतीही जास्तीची माहिती स्वत:हून देऊ नको.” खांडेकर म्हणाले.साक्षीदाराने मान डोलावली.“ तुझ्या बाबांनी अगदी एक सारख्या दिसणाऱ्या आणि एकाच प्रकारच्या तीन रिव्हॉल्व्हर खरीदल्या होत्या हे आता समोर आलंच आहे.ओळखण्यासाठी आपण त्याचं वर्णन असं करू, जी त्यांनी तुला दिली त्याला रिव्हॉल्व्हर क्र. १- कुमारची रिव्हॉल्व्हर म्हणू. जी बाबा