*संत जनाबाई* -------------------------गंगाखेड नावाच्या गावात राहणाऱ्या, ‘दमा’ नावाच्या एका श्रद्धाळू विठ्ठल भक्ताची, जनाबाई ही मुलगी. संत जनाबाई हिचा जन्म अंदाजे शके ११८० (इ.स.१२५८) साली झाला. तिच्या घराण्याबद्दल उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत: केलेला आहे. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, विठ्ठलभक्त असणार्या, पंढरपुरात वास्तव्य करणार्या, शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका विठ्ठलवेडा