दिल... दुनियादारी व सीमारेषा दिवानखान्यात नानासाहेब व सुलक्षणाबाई बसल्या होत्या.नानासाहेब पेपर वाचत होते.सुलक्षणाबाई पायमोजे विणीत बसल्या होत्या. "बाबा.कॉफी.." सविता टिपाॅयवर कॉफी ठेवत म्हणाली. "अग,हे काय? रंजना आली नाही काय?" सुलक्षणाबाईनी विचारले. " आलीय पण मी तिला बागेत झाडांना पाणी द्यायला पाठवलंय." "अग, या दिवसात अशी धावपळ करायची नसते."सुलक्षणाबाई म्हणाल्या. " आई ,मी काळजी घेईन. माझ्या अभयची निशाणी मी जीवापाड जपेन." पाणवलेल्या डोळ्यानी सविता पुन्हा स्वयंपाकघरात गेली. सुलक्षणाबाई आपल्या सुनेकडे पाहत ... सुन्नपणे बसून राहिल्या. सविता तिची सून लग्नानंतर काही काळातच विधवा झाली होती. लग्नानंतर ती किती आनंदात व सुखात होती.पण या सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली होती. खरं तर सविता सामान्य कुटुंबातील होती.नानासाहेबांच्या मित्राची