चकवा अंतिम भाग 6तासभर दम खावून ते उतरणावरून पुढे निघाले. गावकुसाजव्ळ गेल्यावर कोंबड्याची बांग ऐकू आली. आता चांगलं फटफटायला लागलेल होतं. दमा दमाने अंदाज घेत ते पुढे निघाले नी थोड्या अंतरावर वहाळ लागला. एकाने परिसर ओळखला...... ह्यो नाडणचो व्हाळ सो वाटता....... म्हंजे आमी विजेदुर्गाकडे न जाता उलट्या दिशेन नाडणात इलव.... म्हंजे आमका बत्ती दिसली ती गडारची नव्हती..... देवगडची हुती.....अंदाज खरा होता. ते नाडणात आले होते. आता चांगलं दिसत होत. त्यानी चांभारघाटीच्या दिशेने मोहरा वळवला. तासाभराने परबाचं होटेल उघडलं. चुकार माकार माणस यायला लागली होती. सकाळच्यावेळी हे शिख़ इथे कसेकाय आले ? म्हणून माणसं वळून वळून त्यांच्याकडे पहात होती. आता त्यानी