चकवा - भाग 5

  • 474
  • 1
  • 174

चकवा भाग 5 ती सात एकर जमिन दोन एकर गुरवाकडे,दोन एकर देवस्थानला  तेल घालायचा मोबदला म्हणून रावताकडे आणि तीन एकर देवीची कुड  असलेल्या कोकाट्यांच्या ताब्यात होती. कोकाट्यांची पिलग़ी वाढून वीस उंबरे झाले होते . पण त्यापैकी पाच मुख्य घरवडींकडे  जमिनीचा ताबा होता.  स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या राज्यात कुळकायदा आला. त्याचा फायदा घेवून मराठ्यांच्या ताब्यात असलेली जमिन कुळाना कसायला दिलेली होती ती बरीचशी कुळानी बळकावली. पुजारी मराठ्यांच्या ताब्यातली बरीच जमिनही अशीच कुळानी बळकावली. पण त्यातही काही  पापभीरू कुटुंबानी  आपला ताबा सोडला. गुरव , तेली नी कोकाट्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीही अशाच कसणारानी बळकावल्या. मात्र  बाबूने त्याच्या ताब्यात असलेली एक एकर जमिन  आपल्या नावावर लावून न