चकवा - भाग 2

  • 573
  • 1
  • 198

चकवा भाग 2           गुरं परतीला लागली त्यांच्या मागोमाग मायलेकरं चालत निघाली नी थोड्याच वेळात घाटीचं उतरण आलं. ही कुठची वाडी काय त्याची ओळख पटेना. पण थोड्याच वेळात घरं दिसायला लागली. पहिल्यानेच लागले त्या घराकडे अनशी निघाली. घरातला कोणतरी बापया आंगणात उभा होता. "भावजीनू , मी  चिचेबुडच्या देवू  परटाची मागारीण..... माजा म्हायार चवान वाडीत बाबू हडकराकडे...... परत येताना आमी वाट चुकॉन हय उतरलंव......." त्यांच हे बोलणं सुरु असताना घरातून दागिन्यानी मढलेली गोरी बाई पुढे आली. " तू  चिचे बुडच्या साईत्र्ये परटीणीची सून ना ग्ये? तुजी सासू  येवची आमच्या कडेन. तुजो घोव पण जीवत आसताना कवटां घेवन् येयाचो.