दंगा - भाग 12

  • 1.1k
  • 1
  • 474

१२         केशर शाहीनसोबत राहू लागला होता. त्याला आज करमत होतं तिच्यासोबत राहतांना. परंतु आज त्याला गतकाळ आठवत होता. गतकाळातील ती शाळेतील मित्रमंडळी आठवत होती. ती मित्रमंडळी, ज्यावेळेस त्याचं वेतन बंद होतं, त्यावेळेस त्यांनी त्याला हिंमत दिली होती. तो त्यानंतर त्यांना जीवनात कधीच विसरला नाही.            केशरला आठवत होते, ते त्याच्या नोकरीदरम्यानचे दिवस. त्या दिवसात काही महिला शिक्षिका होत्या की त्यांनी केशरला त्रासच दिला होता. तरीही केशर त्यांच्यावर राग दाखवत नव्हता. उलट त्याला आपलेच प्रारब्ध समजून शोषत होता ते चटके. जे चटके सुर्याच्या उष्णतेपेक्षाही कडकच होते.            आज शाहीन सोबत होती केशरच्या.