दंगा - भाग 11

११        डॉक्टर बाबासाहेबांची जयंती. जगात डॉक्टर बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी होणार आहे. त्याचं कारण आहे, त्यांना मानत असलेली मंडळी. आज डॉक्टर बाबासाहेबांना बरेच लोकं मानायला लागले आहेत. परंतु आजही काही लोकं तांदळातील खड्यासारखे आहेत की जे तांदळातील खड्यागत स्वतःला थोर समजतात व डॉक्टर बाबासाहेबांचा पदोपदी अपमान करत असतात. जसं की डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांचं भलंमोठं नुकसानच केलं आहे.          डॉक्टर बाबासाहेबांबद्दल सांगायचं झाल्यास सर्वांनाच माहीत आहे की त्यांनी संविधान बनवलं व त्याच संविधानाअंतर्गत त्यांनी जगाला संदेश दिला. जेव्हा त्यांनी घटना बनवली. त्या घटनेत त्यांनी सर्वप्रथम ओ बी सी वर्गासाठी कलम लिहिली. जी कलम तिनशे