दंगा - भाग 8

  • 546
  • 174

८                     रोहिणी तिचं नाव होतं. ती हिंदू होती व तिचा विवाह केशरशी झाला होता. काही दिवस त्यांचं चांगलं पटलं होतं. परंतु काही दिवसानंतर त्यांच्यात धर्मावरुन वाद होत होते. केशरचं म्हणणं होतं की रोहिणीनं मुस्लिम पद्धतीनं वागावं. तिनं हिंदूंच्या पुर्ण चालीरीती सोडून द्याव्यात. तसं पाहिल्यास रोहिणीनं बऱ्याच गोष्टी परिस्थितीवश जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. तिनं मस्तकावर टिळा लावणं सोडून दिलं होतं. तसं तिनं आपलं नावही बदलवून शाहीन खान ठेवलं होतं. तो बुरखा तिला सहन होत नसतांनाही तिनं बुरख्याचा स्विकार केला होता व ती नाईलाजास्तव का होईना, बुरखा वापरत होती.