७ केशर गरीब होता, जेव्हा तो गावाकडे राहात होता. त्याच्या वडीलांची दोन एकर शेती होती. तिही कोरडवाहू होती. कोकणात पाऊस भरपूर यायचा. परंतु डोंगरउतारावरुन पाणी पुर्णतः उतरुन जायचं. त्यामुळं भातशेती व्हायची नाही. तसं पाहिल्यास शेतात नारळाची झाडं होती. त्याही झाडाला जास्त नारळ येत नसत. त्याचं कारण असायचं पाणी. नारळाच्याही झाडाला पाणी जास्तच लागायचं. शेतीला पूरक असा जोडधंदा नव्हताच केशरच्या वडीलाच्या घरी. त्यामुळंच विश्वकोटीचं दारिद्र्य अनुभवत होता केशरचा परीवार. शिवाय घरात खाणारीही तोंड जास्तच. अशातच केशर शिकला व लहानाचा मोठा झाला होता. केशर हा मुस्लिम होता. त्याचं नाव केशर खान होतं. त्याला