दंगा - भाग 3

  • 588
  • 228

३                       मुलांच्या आत्महत्या......  मुलांचा बौद्धिक विकास खुंटविण्याला जबाबदार घटक भरपूर आहेत. ज्यात शिक्षक, संस्थाचालक, सरकार आणि पालकांचा समावेश आहे. शिक्षक यासाठी जबाबदार की तो शिकवतो. त्याचा थेट संबंध विद्यार्थ्यांशी येतो. ते जर चांगले शिकविणारे असले वा त्यांचं त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगलं समजत असेल तर तो विद्यार्थी शत प्रतिशत बौद्धिक ज्ञान हस्तगत करु शकतो आणि शिक्षकांचं शिकवणं जरी चांगलं असेल आणि ते त्या विद्यार्थ्यांना अजिबात समजत नसेल तर त्याच्यातील बौद्धिक ज्ञानाची खिल्ली उडत असते. त्यातच त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे समजत नसेल तर त्याला शिक्षणाबद्दल असुया वाटायला लागते व तो बौद्धिक दृष्टीनं शिक्षणातून मागे