प्रकरण १० : शिवगडचा रणसंग्राम विक्रांतच्या फोननंतर चेतन आणि देशमुख वेगाने लॉजकडे निघाले. गाडीत जाताना चेतनने विचार केला — " श्यामने इतक्या लवकर हालचाल केली म्हणजे त्याला विक्रांतबद्दल माहिती मिळालीच आहे ! " " आपण उशीर केला तर विक्रांत संपला ," देशमुखने घड्याळाकडे पाहत म्हटलं . चेतन गाडीचा वेग वाढवत म्हणाला , " आज आपण श्यामच्या खेळाचा शेवट करणार " . लॉजवरचा हल्ला लॉजजवळ पोहोचताच त्यांनी पाहिलं — दरवाजे तुटले होते , आणि आतून गोळ्यांचा आवाज येत होता ! चेतन आणि देशमुखने सावधपणे पिस्तूल काढलं आणि लॉजमध्ये प्रवेश केला. आतील दृश्य भयानक होतं—टेबलं उलटलेली , खिडक्या फुटलेल्या, आणि