घरच्या_आंब्यांची_कहाणी ?

आंबा पहिल्यापासून अतिशय आवडत फळ फळांचा राजाच तो .. त्यात घरी वडिलांना आंब्याची अतिशय आवड अगदी बाजारात आंबा आल्यापासून ते आंबा मिळणे बंद होईपर्यंत घरी आमरस असायचा मात्र त्यावेळी जास्त करून पायरी आंबा मिळायचा माझ्या आजोळी शेतात आंब्याची झाडे होती मे महिन्यात तिकडे दोन खोल्या भरून आंब्याची आढी घातलेली असे आढी घातली की आमंत्रण येई ..लगेच आम्ही सर्व भावंडे तेव्हा तेथेच सुट्टी साठी जात असू . आणि मनसोक्त आंबे खात असू यानंतर यथावकाश लग्न झाले काही वर्षानी जेव्हा घर बंधायचे ठरले मोठी जागा बागेसाठी असेल अशाच ठिकाणी घर बांधले चिक्कू ..पेरू ..अंजीर.. केळी .. नारळ यासोबत रत्नागिरी हापूस ची दोन कलमी झाडे आणून लावली तीन वर्षात फळे धरतील अशी ती उत्तम प्रतीची