गुळांबा?

  • 258
  • 75

गुळांबा..नुसते नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटत ..आणि अनेक आठवणीं येतात एक पाउस पडला की  गुळांबा अथवा मुरांबा करण्या साठी बाजारात कैऱ्या येऊ लागतात.मग घरोघरी वर्षभराची “बेगमी “म्हणुन लोणची ,मुरांबे घातले जातात .जेणे करून पुढील उन्हाळ्या पर्यंत ची काळजी मिटेल .लहानपणी मी फार गोडखाऊ होते ,बटाटा ,भेंडी ,अशा एक दोन आवडीच्या भाज्या सोडता इतर कोणत्याच भाजीला मी हात लावत नसे ..मग तूप गुळ,तूप साखर ,गुळांबा साखरआंबा ,यांच्या बोली वरच मी जेवत असे . त्यावेळी.  गुळांबा हुकमी एक्का असे. आई लगेच मला गुळांबा वाढत असे आणि जेवण पार पडे.मी घरी एकुलती एक मुलगी होते त्यामुळे मला खेळायला भावंड नव्हते इतर सर्व नातेवाईक व माझी चुलत मावस