राजहंस

  • 2k
  • 795

खूप वेळ रांगेत उभं राहावं लागलं, पण शेवटी ग्रंथालयाचं सभासद कार्ड मिळालं.... कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन जवळपास एक महिना उलटून गेला होता, पण अजून कार्ड मिळालेलं नव्हतं. आज अखेर ते हाती लागलं! आठवड्यात फक्त एकच पुस्तक घेता येईल, अशा ग्रंथालयाच्या नियमामुळे "सुरुवात एखाद्या अभ्यासाच्या पुस्तकाने करावी" असा विचार करून मी ग्रंथालयात शिरलो. पण ती मोठी-मोठी तांत्रिक संदर्भ पुस्तकं आणि त्यांची जाडजूड, गंभीर कव्हरं पाहून मी थोडा विचारात पडलो – “ही पुस्तकं खरंच आत्ताच घ्यायला हवीत का?” मनात विचार आला – “कॉलेज तर नुकतंच सुरू झालंय, अजून खूप वेळ आहे. ही पुस्तकं नंतरही घेता येतील... आत्ताच घाई करायचं काही कारण नाही." असं स्वतःशी