सुगंधा माझ्या जुन्या ओळखीतील मुलगी होती माझ्या आजोळच्या गावची ..एका लहान गावातली ही मुलगी लग्न होऊन माझ्या शहरात आली शहरात आली तेव्हा एक दोन वेळ भेटली असेल नंतर तिनेही काही संपर्क ठेवला नाही आणि मी सुद्धा माझ्या व्यापात गर्क राहिले तिचा स्वभाव थोडा तुसडा असल्याने मीही ही गोष्ट फार मनावर नाही घेतली काही वर्षानी माझ्या समोरच्याच. चाळीत ती रहायला आली मग मात्र मला ती नेहेमीच दिसत असेतिला दोन मुले सुद्धा झाली होती पण तरीही तिच्यात कोणताच बदल झाला नव्हता.स्वभाव चिडचिडा ,नवीन गोष्टी स्वीकारायची इच्छा नाही त्यामुळे सतत नाराजी .!!तिच्यामुळे नवरा मुले नेहेमीच नाराज असत मला कधी ती समोर भेटली तर