मुलांनी घरदार सांभाळायला शिकावं. मुलांनी घरदार सांभाळायला हवं. ही बाब सत्य आहे. परंतु आजचा काळ असा आहे की मुलांना मायबाप जन्म देतात. ती मुलं लहानाची मोठी होतात. खुप शिकतात. परंतु कामाला लागत नाहीत. तर ती ओझं बनून मायबापाची मालमत्ता उधळीत असतात. अशी बरीच कुटूंब आहेत की जी आपल्या वडीलांनी कमविलेल्या मालमत्तेवरच जगत आहेत. शिक्षण..... शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो पिणार. तो गुरगुरणारच. परंतु आजचं शिक्षण असं नाही की जो घेईल. तो गुरगुरेल. आजचं शिक्षण हे उच्चप्रतीचं आहे. परंतु गुरगुरणारं नाही. तर ते शिक्षण गुलाम घडविणारं आहे. आजच्या