ते अजून जिवंत आहेअ - अध्याय 4

  • 1.2k
  • 516

अध्याय ४ : वाड्याच्या सावलीत राजूने महंतांकडे भीतीने पाहिलं . " तो आता तुझ्यासोबत आला आहे , " महंतांच्या शब्दांनी त्याच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली . त्याने हळूच मागे वळून पाहिलं ... आणि त्याच्या सावलीत एक अजून सावली उभी होती ! अज्ञात स्पर्श राजू काही बोलण्याच्या आधीच त्याला कोणीतरी गळ्याजवळ स्पर्श केल्यासारखं वाटलं . तो स्पर्श थंडगार होता ... जणू मृत्यूलाच त्याने स्पर्श केला होता ! त्याने जोरात मागे पाऊल टाकलं , पण त्याच्या खांद्यावर एक काळसर खूण उमटली ! महंतांनी ती खूण पाहिली आणि गंभीर स्वरात म्हणाले , " हा शाप तुझ्या शरीरात उतरत आहे . तुला काहीतरी करावं