प्रकरण ८: सावलीतला भागीदार चेतन आणि देशमुख एका जुन्या गोडाऊनमध्ये बसून श्यामला गडगडवायची योजना आखत होते. "विक्रांत शेट्टी—श्यामचा भागीदार. हा माणूस आपल्या बाजूने आला तर श्याम संपला समजा," चेतन म्हणाला. देशमुखने विचारलं, "पण तो आपल्याला मदत का करेल? तोही तर श्यामच्या गुन्हेगारी जाळ्याचा भाग आहे." चेतनने हसत उत्तर दिलं, "कारण प्रत्येक गुन्हेगाराला स्वतःचा जीव प्रिय असतो. आणि आपल्याकडे त्याच्याविरोधात पुरावे आहेत!" .विक्रांत शेट्टीचा शोध विक्रांत शेट्टी हा मोठ्या व्यवसायांमध्ये श्यामचा सावलीतला भागीदार होता. तो कधीही समोर येत नसे, पण सगळ्या मोठ्या डील्समध्ये त्याचा सहभाग असे. चेतनने विक्रांतची माहिती मिळवण्यासाठी एका जुन्या ओळखीचा वापर केला—सलीम, जो पूर्वी श्यामसाठी काम