ऋतु शब्दांचे हे कवितेचे पुस्तक एके वर्षी प्रकाशित झाले होते (ज्या मध्ये माझ्या पाच कविता होत्या )याचे प्रकाशन झाल्यानंतर त्याच्या प्रती मी माझ्या कवी मित्रांना स्वत कुरियर करून पाठवल्या ..त्यातच माझे एक रसिक जाणकार फेसबुक वर ओळख झालेले कविमित्र पण होते .मी ज्या कुरियर कडून पुस्तके पाठवत होते ती सर्व्हिस. दुर्दैवाने त्यांच्या गावी नव्हती..त्यांना तर खूप इच्छा होती त्यांना हे पुस्तक मिळावे ..मग मी ते पोस्टाने स्वखर्चाने त्यांना माझे पुस्तक पाठवले.पण खूप दिवस गेले तरी त्यांना ते पुस्तक नाही मिळाले ..मला खूप वाईट वाटले ...मग त्यांना विचारले पुण्यात येवून तुम्ही प्रत घेता का ..?त्यांनी होकार दिला ..मग मी माझ्या पुण्यातल्या