बी.एड्. फिजीकल - 22

  • 726
  • 1
  • 216

बी.एड्. फिजीकल  भाग  २२             (अंतीम  भाग )         कांदिवलीची कार्य प्रणाली अशी होती की अगदी ग़ोणपाट छाप प्रशिक्षणार्थी सुद्धा शेवटी शेवटी कां होईना  वर्गात बऱ्यापैकी  टिकायला लाग़ते. सातत्यपूर्ण सराव आणि निरिक्षण यातून माणूस घडतो हे इंगित वर्षअ‍खेअरीला मला उमगलं. त्या काळी कांदिवलीतला शिक्षकआणि तिथलं प्रशिक्षण हा शारिरीक शिक्षण क्षेत्रातला ब्रॅण्ड होता. आज असं एखाद्या क्रीडा प्रशिक्षण महाविद्यालयाचं नाव ठेपून घेता येत नाही हे वास्तव आहे. १९३८ मध्ये महाविद्यालय स्थापन झाल्यावर तत्कालीन ब्रिटिश प्राचार्य हे नामांकित शिक्षण तज्ञ होते. आज मला त्यांचं नाव स्मरत नाही आणि गुगलवरही कांदिवली शा.शिक्षण महाविद्यालयाची काहीही माहिती  उपलब्ध होत नाही.