बी.एड्.फिजीकल,कांदिवली भाग२१ दुसरा मित्र राऊळ सावंतवाडी जवळ नेमळे हायस्कूलला, चावरेकर रत्नागिरीला शिर्के हायस्कूलला, आणि लिमये नाणिज हायस्कूलला शिक्षक होते. मी राजापूर तालुक्यातली हेडमास्तरची पोस्ट सोडून देवगड बी. एड्. कॉलेजला प्राध्यापक पदावर गेलो. त्यामुळे प्रभू नी राऊळ यांच्याशी माझा कायम संपर्क राहिला. राऊळ नेमळे हायस्कूलला होता. सावंतवाडीकडे खेप झाली की मी आवर्जून नेमळ्याला जावून त्याला भेटत असे. प्रभू बी.एड्. झाल्यावर त्याला गावातच मुणगे हायस्कूलमध्ये जॉब मिळाला. शेवटच्या टप्प्यात तो हेडमास्तर झाला. तेव्हा मी त्यांच्या ग़ॅदरिंगला चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो. मध्यंतरी एकाविवाह सोहोळ्याच्या निमित्ताने कुरुंदवाडला दमित्री जोशी मेडिकल वाल्यांकडे गेलो होतो. या गावचा फडणीस माझ्याबरोबर कांदिवलीला होता असं मी म्हटल्यावर त्यांची