त्या दिवशी मी तिच्याकडे पाहिले आणि स्तब्ध होऊन गेले होते . आईच एक वेगळंच रूप बघायला मिळाले मला .माझी आई जी एरवी कुणी अनोळखी व्यक्ती जरी वारला तरी खूप रडायची .वर्तमानपत्रात जर तीने वाचलं कि कोणाचा मृत्यू झाला आहे ,तर आईचे लगेच डोळे पाणावतात ती व्यक्ती मग ओळखीची असो किंवा नसो. इतकी हळवी आहे माझी आई. त्या दिवशी, म्हणजे ११ सप्टेंबर २०२०रोजी, चार - साडेचार वाजेच्या सुमारास जेव्हा आईला फोन आला की तिचे जीवनदाते वडील, म्हणजेच माझे आजोबा वारलेत असा निरोप आला. तेव्हा मात्र तिने डोळ्यातून एकही अश्रू येऊ दिला नव्हता. तिच्या अशा वागण्यामागे एक कारणं होत. ती रडत नव्हते