पोटाच्या आगी पेक्षा उन्हाचे चटके बरे....

  • 930
  • 291

    दुपारच्या रणरणत्या उन्हात अन्नाचा वेध घेणारी गरीब मुले पाहिले की समजते उन्हाच्या चटक्यां पेक्षा रिकाम्या पोटाच्या वेदना जास्त त्रास देतात. जेव्हा पण गरीब मुलांना रणरणत्या उन्हात पोटाच्या भुकेसाठी फिरताना बघावं तेव्हा दर वेळेस माझे मन सुन्न होऊन जाते. काय करावं काही सुचत नाही .असं वाटतं देव यांच्याच सोबत इतका कठोर का वागतो .       दहावीत असताना मी एक दृष्य बघितले ते आठवले की आता देखील अंगाला काटा येतो .मी माझ्या दहावीच्या परीक्षेस जात असतांना, मी असं काही पाहिले की पेपर मध्ये लक्षच लागले नाही. फेब्रुवारीच्या कडक उन्हात , दुपारी बारा - एक वाजेच्या सुमारास गाडीवरून वडिलांसोबत जात