रामनवमी

 राम नवमी आली की आजोळची आठवण येतेच..माझ्या आजोळी रामाचे देऊळ आहे आजोळ बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा.. त्या पंचक्रोशीत तेव्हा ते एकच रामाचे देऊळ त्या लहान खेड्यात  होते .आमचा आजोळचा वाडा खुप मोठा व दोन मजली होता .मुख्य दरवाजातून आत गेले की दोन बाजूला दोन जोते नंतर मोठे आंगण मग पडवी ,मध्यभागी रामाचे देऊळ त्याच्या शेजारी रामाच्या पोथीची व पूजेच्या साहीत्याची एक छोटी खोली देवळाच्या डाव्या बाजूला एक बैठकीची खोली ..त्यानंतर मोठे स्वयंपाक घर ,त्यामध्ये एक मोठे जुन्या पठडीचे बाथरूम ,आतुन वरच्या मजल्यावर जायला लाकडी जीनापुढे एक माजघर जिथे पाणी तापवायची चूल व मोठा हंडा होता देवळाच्या उजव्या बाजूस एक आंब्याची आढी घालायची स्वतंत्र खोली कारण