चाळीतले दिवस - भाग 13

  • 753
  • 252

चाळीतले दिवस भाग 13  माझी चिंचवड दूरध्वनी केंद्रातली नोकरी सुरु होऊन एक महिना उलटून गेला होता.आमच्या केंद्राचे प्रमुख कृष्णासर होते. त्यांना ऑफिसने दिलेले घर आमच्या केंद्राच्या आवारातच होते त्यामुळे घराच्या बाल्कनीत बसूनच कोण ऑफिसला उशीरा आले ते त्यांना समजायचे.   सकाळी सातच्या ड्युटीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे.स्वभावाने अत्यंत खडूस असलेल्या या साहेबांकडून सकाळी सात वाजून पाच मिनिटाने जरी ऑफिसला पोहोचलो तरी वॉर्निंग लेटर मिळायचे.असे तीन मेमो मिळाले की एक रजा वजा व्हायची.  येरवडा ते चिंचवड सायकल कितीही जोरात दामटली तरी सातच्या ड्युटीवर पोहोचायला उशीर व्हायचा.नवीन असल्याने जास्त करून हीच ड्युटी माझ्या वाट्याला यायची.सुपवायझरसुद्धा भरपूर फायरिंग करायचे त्याचा त्रास व्हायचा.   एक दिवस