अनुबंध बंधनाचे. - भाग 41

अनुबंध बंधनाचे.....( भाग ४१ )अंजलीची झोप लागली असावी असं समजुन मॉम तिथून उठतात. तेवढ्यात त्यांची नजर टेबलवरील गोळ्यांच्या डब्याकडे जाते. ते पाहुन त्यांच्या मनात शंका येते. घाबरून त्या पुन्हा अंजलीला उठवण्याचा प्रयत्न करतात. पण अंजली पूर्णपणे बेशुद्ध पडली होती. ती कसलाच रिस्पॉन्स देत नव्हती. मॉम बॉटल मधील पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यावर मारून तिला जागं करण्याचा प्रयत्न करतात. पण अंजली उठत नव्हती. ते पाहुन मॉम रडायला लागतात. हा सर्व प्रकार पाहून सिद आणि मेघा पण घाबरून जातात. ते दोघेही तिला आवाज देऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करतात. मॉम तिच्या मानेला पकडुन तिला उठवण्याचा प्रयत्न करतात. अंजलीने मात्र पुर्ण अंग टाकून दिले होते. रात्रीचे दहा वाजायला