भ्रमंती सिंधुदुर्गाची - 3

  • 1k
  • 393

भ्रमंती सिंधुदुर्गाची ३आंबोली  आंबोलीला कधी जावे असा प्रश्न बरेचजण विचारतात. मी त्यांना सांगतो कधीही जा ,आंबोली सतत नितांत सुंदर असते.पण प्रत्येक मौसमात तिचे रंग ढंग वेगळे असतात.आंबोलीचे हे बदलते रुप बघण्यासाठी आपल्याला तिन्ही ॠतूत जावं लागतं.पावसाळ्यात आंबोली ओलेत्या सुंदर स्त्री सारखी दिसते.हिवाळ्यात ती शरदाच्या शितल चांदण्या सारखी भासते.उन्हाळ्यात ती सुखद गारवा देणार्या चैत्रपालवी सारखी सामोरी येते. आंबोलीत बघण्यासारखं काय आहे? तर अख्खी आंबोली डोळ्यात किती साठवली तरी पाऱ्या सारखी निसटून जाते.नावच घ्यायची झाली तर कावळेसाद ,महादेव गड दर्शन पॉईंट, हिरण्यकेशी नदीचा उगम, नांगरतास धबधबा, फॉरेस्ट गार्डन व तिथली फुलपाखरांची बाग,पूर्वीचा वस, मोठा धबधबा,बाबा धबधबा (खासगी जागा).मी आंबोली अनेकवेळा पाहिली आहे.पण प्रत्येक