नवरा काबाडकष्ट करून घर चालवायचा तिथपर्यंत कधी कामच नाही पडलं बाजारात काही खरेदी विक्री च सर्व आयत मिळायचं घरच्या घरी.आपण फक्त घर आणि मुले संभाळायची आणि रात्री उशिरापर्यंत नवऱ्याला खटल्यावर असा नित्यक्रम होता शिला बाईचा.अचानक एकेदिवशी अपघातात नवरा गेला शेजारी पाजारी,नातलग यांच्या जोडीने महिना काढला पण कोण किती पुरवणार,शेवटी शिला ने मनाशी ठाम विचार करून काहीतरी काम करायचे ठरविले होते,कारण पदरी तीन मुलाचा डोलारा होता.तिने एका घरी काम धरले ते स्वयंपाकाचे घरात तीन माणसं काका-काकू व त्याचा तरुण मुलगा.मुलगा ड्युटी वर जायचा म्हणून ९.३०ला स्वयंपाक रेडी हवा होता म्हणून ती सकाळी लवकर जाऊन कामे आटपायची तिची मुलगी शाळेत जायची म्हणून